प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Crime News: गेट दुगेदरच्या कार्यक्रमात डॉक्टर महिलेकडे शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी करून संबंध ठेवले नाही तर बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी अॅड प्रशांत जीवन पाटील (रा.करण हेरिटेज,देवकर पाणंद) याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात विनभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची माहिती अशी,संबंधित महिला डॉक्टर आणि संशयित प्रशांत पाटील 1987साली विद्यापीठ हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात एकत्र होते.त्यामुळे त्यांची ओळख आहे.या बॅचचे 2007पासून दरवर्षी गेटदुगेदर आयोजित करण्यात येते.कोरोनानंतर 8 मे 2022रोजी नरकेवाडी ता.करवीर येथील फार्म हाऊसवर कार्यक्रम सुरु असताना दुपारच्या वेळी प्रशांत पाटील हा चिकूच्या बागेत असलेल्या संबधित डॉक्टर महिलेजवळ गेला.त्याने तिला उद्देशून तु माझ्याशी शारीरीक संबंध ठेव,जर माझ्याशी संबंध ठेवले नाहीस तर तुझी बदनामी करणार,तुझा संसार मोडीन असे म्हणाला.त्यावेळी भीतीमुळे त्या महिलेने ही घटना कोणालाही सांगितली नाही.
अधिक वाचण्यासाठी- झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह,लक्ष्मी टेकडी येथील घटना
त्यानंतर जुलै 2022मध्ये महिलेचा वर्गमित्र महेश माळकर हा त्यांच्या घरी गेला होता.त्यावेळी त्यांने प्रशांत पाटील आणि एका महिलेचे अनैतिक संबंध असून त्यांच्या संभाषणाची क्लिप असून त्या क्लिपध्ये दोघेजण चांगले बोलले नसल्याचे सांगितले.28 सप्टेंबर रोजी उदय निगडे याच्याकडून संभाषणाची ऑडीओ क्लिप मोबाईलवर सेंड करुन ती ऐकली असता त्यामध्ये प्रशांत पाटील आणि एका महिलेचा आवाज होता.त्यामध्ये ते दोघेजण पिडित डॉक्टर महिलेसह वर्ग मित्र आणि मैत्रीणीबाबत घाणेरडी चर्चा करत होते.पाटील याची गेटदुगेदर कार्यक्रमातील वर्तणूक आणि क्लिपमधील संभाषणाच्या धास्तीमुळे डॉक्टर महिलेच्या आरोग्यावर परिणाम झाला.त्यामुळे तिच्या पतीने विचारल्यावर त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली.त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी रात्री संबंधित महिलेने करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









