Woman committed suicide by hanging herself in Achara-Dongrewadi
आचरा डोंगरेवाडी येथील सुलोचना विजय चिरमुरे वय 65 रा.आचरा डोंगरेवाडी यांनी राहत्या घरात लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली या बाबतची खबर तिचा मुलगा भगवान चिरमुले यांनी आचरा पोलिसांना दिली. सदर घटनेची आचरा ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आचरा डोंगरेवाडी येथील सुलोचना चुरमुरे या आपल्या पतीसह डोंगरेवाडी येथील घरी राहत होत्या. त्याना आजारपणाचा त्रास होता. शुक्रवारी सकाळी त्यांचे पती विजय ऊर्फ बाळा चिरमुरे हे 6.30 वाजता नेहमीप्रमाणे बाजारात गेले होते 9.30 च्या सुमारास घरी आल्यावर त्यांना त्यांची पत्नी गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आली. या घटनेची माहिती त्यांनी जामडुल येथे राहत असलेल्या मुलाला दिली. मुलगा भगवान हा मुळघरी दाखल होत सदर घटनेची माहिती आचरा पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर कोरे. पोलीस उपनिरीक्षक हर्षाली पाटील, हवालदार संदीप कांबळे, मनोज पुजारे यांनी दाखल झाले होते. मुलाने याबाबत आचरा पोलीस ठाण्यात खबर दिली असून आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची आचरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कांबळे करत आहेत. मयत सुलोचना यांच्या पश्चात पती, मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे.
आचरा प्रतिनिधी









