वाद झाल्याने उचलले टोकाचे पाऊल : नातेवाईकांतून हळहळ
वार्ताहर /कुडची
महिलेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी बोमनाळ (ता. रायबाग) येथे उघडकीस आली. यल्लव्वा अर्जुन कनीहोळे (वय 30), सात्विक (वय 5), मुत्तप्पा (वय 1) अशी मृतांची नावे आहेत. बोमनाळ येथे अर्जुन कनिहोळे हा पत्नी व मुलांसह राहतो. शनिवारी त्यांच्यात भांडण झाल्याने पत्नी यल्लव्वा हिने आपल्या दोन मुलांसह बोमनाळ गावच्या हद्दीतील जुन्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नातेवाईकांनी तीनही मृतदेह पाहून हंबरडा फोडला.









