वृत्तसंस्था/ नोएडा
उत्तरप्रदेशातील नोएडा येथील एका इमारतीत चार्टर्ड अकौंटंटच्या पत्नीने स्वत:च्या 11 वर्षीय मुलासमवेत 13 मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीमधून उडी घेत आत्महत्या केली आहे. महिलेच्या हातात सुसाइड नोट मिळाली असून यात पतीला उद्देशून सॉरी लिहिण्यात आले आहे. तसेच या महिलेने सुसाइड नोटमध्ये स्वत:च्या मृत्यूसाठी कुणीच जबाबदार नसल्याचे लिहिले आहे.
या महिलेचा मुलगा मानसिक दिव्यांग होता, यामुळे ती चिंतेत असायची. ही महिला दीर्घकाळापासून तणावात होती असे शेजाऱ्यांकडून चौकशीदरम्यान सांगण्यात आले. या महिलेच्या पतीचे नाव दर्पण चावला असून ते दिल्लीच्या कंपनीत सीए आहेत. ते पत्नी साक्षी चावला (37 वर्षे) आणि 11 वर्षांचा मुलगा दक्षसोबत राहत होते. दक्षवर औषधोपचार सुरू होते. तर घटनेवेळी ते घरात झोपलेले होते. पोलीस आता सुसाइड नोटच्या हँडराइटिंगची तपासणी करवाणार आहेत.









