खोची,वार्ताहर
खोची ता.हातकणंगले येथील अश्विनी संजय मडके (वय ४४ ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.राहत्या घरात छताच्या हुकला दोरीने गळफास घेतला.सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबतची फिर्याद वडगाव पोलीस ठाण्यात त्यांचे दीर गुणधर मडके यांनी दिली.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.मृतदेहाची उत्तरीय तपासणी सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन घोडके व पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका पाटील करीत आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









