देवरुख :
मुलीला प्रवेश देण्याच्या नावाखाली देवरुख–भुवड कॉलनी येथील एका निवृत्त महिलेची तब्बल 35 लाखाची फसवणूक झाल्याची घटना गुरुवारी उघड झाली. याप्रकरणी पुणे येथील विश्वनाथ महादेव धावडे (48, रा. शिवनेरीनगर कोंढवा खुर्द येवलेवाडी–पुणे) याच्याविरुद्ध देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद प्रणिता प्रमोद आगरे यांनी दिली. प्रणिता आगरे यांची मुलगी सुरभी आगरे हिला पुणे येथील पतंगराव कदम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेऊन देतो, असे विश्वनाथ धावडे याने सांगितले. यानंतर त्याने प्रणिता आगरे आणि प्रमोद आगरे यांच्याकडून मुलीच्या प्रवेशाच्या नावाखाली 18 ऑक्टोबर 2022 ते 20 जून 2024 या कालावधीत वेळोवेळी पैसे मागितले. या कालावधीत टप्प्याटप्प्याने एकूण 35 लाख रुपये घेतले गेले. पहिला आणि शेवटचा व्यवहार देवऊख येथील भुवड कॉलनीमध्ये झाला तर दुसरा आणि तिसरा व्यवहार मुंबईतील निवासस्थानी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या रकमेपैकी 32 लाख ऊपये प्रणिता आगरे आणि त्यांच्या पतीच्या बँक खात्यातून रोख स्वऊपात काढून देण्यात आले. मात्र विश्वनाथ धावडे याने प्रवेश करून न देता आपली फसवणूक केल्याचे प्रणिता आगरे यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे. या प्रकरणी विश्वनाथ महादेव धावडे याच्यावर देवऊख पोलीस ठाण्यात गुऊवारी भारतीय दंड संहिता (भादंवि) कलम 420 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रवेशाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. अशा प्रकरणात कोणतेही पैसे देण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.








