वाकरे,प्रतिनिधी
Kolhapur News : गगनबावडा राज्यरस्त्यावर बालिंगे पूलानजिक भोगावती नदीपात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला.ऋतुजा स्वप्नील कांबळे (वय- ३०) रा.सध्या विक्रमनगर,मूळ गाव सैतवडे,ता.गगनबावडा यांचा हा मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे. ही आत्महत्या की खून असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागदेववाडी येथील काही युवक शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास भोगावती नदीत पोहायला गेले होते.त्यांना महिलेचा मृतदेह नदीत दिसला. या युवकांनी तात्काळ याची माहिती बालिंगेचे पोलीस पाटील सुरेश पाटील यांना देण्यात आली. या मृतदेहाच्या कमरेभोवती दगड बांधल्याचे दिसून येत आहे. तसेच मानेवर जखमा दिसत आहेत.त्यामुळे ही आत्महत्या की खून याबाबत संभ्रमावस्था आहे.पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.









