Kolhapur Women Beating : मुलांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या गैरसमजातून घरात घुसून महिलेला मारहाण करण्यात आली आहे. हि घटना पन्हाळा तालुक्यातील देवाळे या गावात घडली. या प्रकरणी कोडोली पोलीसांनी दहा महिलांना मंगळवार (दि. १३ रोजी) अटक केली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
मंगळवारी रात्री मुलांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या गैरसमजातून देवाळे येथील महिलेला मारहाण करून गळ्यातील मनी मंगळसूत्र हिसडा मारून तोडून नेले. यानंतर पिडीत महिलेने कोडोली पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद केली. मारहाण करणाऱ्या दहा महिलांना फौजदार नरेंद्र पाटील यांनी तोडलेल्या मनी मंगळसूत्रासह अटक केली.
या प्रकरणी भारती अशोक जाधव, मिना दिलीप माने, साक्षी जिवन थोरात, सोनिया अतुल थोरात, राणी शरद थोरात, श्रीदेवी नारायण माने, छाया दिनकर माने, वैशाली विक्रम साळुंखे, रिना संदिप थोरात, मंगल अशोक थोरात सर्व रा. देवाळे ता. पन्हाळा या दहा महिलांना अटक केली आहे. शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक रविंद्र सांळीखे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस.ए.डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.
Previous Articleतंबाखूजन्य पदार्थांच्या किंमतीवर करवाढ आवश्यक
Next Article अटल सेतुवरील अपघातांकडे गांभीर्याने कधी पाहणार?









