Ratnagiri Crime News: पती आपल्या लहान मुलीला ओरडल्याच्या रागातून विवाहितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील या विवाहितेने फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. काजल कृष्णा बेगडा (२६,रा.साळवी स्टॉप,रत्नागिरी) असे फिनेल प्राशन केलेल्या या विवाहितेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.१७) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
हेही वाचा- Kolhapur Rain: परतीच्या पावसाचा तडाखा, कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काजल हिचे पती आपल्या लहान मुलीला रागावले.त्याचा राग मनात धरुन काजलने घरात असलेले फिनेल प्राशन केले. तत्काळ उपचारासाठी पती कृष्णा बेगडा यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तिची तब्बेत सुधारत आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









