खेड :
तालुक्यातील एका गावातील महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रवींद्र सीताराम पवार (48 रा. कुडोशी-खेड) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी 10 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.ही घटना 5 एप्रिल 2020 मध्ये घडली होती.
आरोपी पीडित महिलेच्या घरी घुसून वारंवार माझ्यावर प्रेम कर असा तगादा लावत सतत त्रास देत होता. पीडितेने त्याला नकार दिल्याचा राग मनात धरत त्याने तिला पट्ट्याने मारहाण केली. तसेच डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अॅड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले.







