अहमदाबाद
काही दिवसांपूर्वी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. यानंतर अहमदाबाद येथील 2 शाळा आणि बीजे मेडिकल कॉलेजमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. या सर्व धमक्या ईमेलद्वारे मिळाल्या होत्या. गुजरात पोलिसांनी अखेर याप्रकरणी रेने जोशिल्दा नावाच्या युवतीला अटक केली आहे. रेने हे चेन्नईतील प्रख्यात बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. रेनेने बनावट आयडी तयार करत, व्हीपीएन आणि डार्कवेबच्या मदतीने धमकीचे ईमेल पाठविले होते. केवळ गुजरातच नव्हे तर 11 राज्यांना तिने धमकीचे ईमेल पाठविले होते.









