मसूर प्रतिनिधी
कराड तालुक्यातील पाडळी(हेळगाव) येथे शेततळ्यात तिघींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.रागिणी रामचंद्र खडतरे (वय -11),वैष्णवी गणेश खडतरे (वय- 15), शोभा नितीन घोडके (वय -30) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,पाडळी तालुका कराड येथे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास 9 जण पोहायला गेले होते. यापैकी पाण्यात बुडून तिघींचा मृत्यू झाला. तर सहा जणांना वाचवण्यात आले. या घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेने पाडळी गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
Previous Articleसातोसे येथे १८ रोजी ‘संत कान्होपात्रा’ नाट्यप्रयोग
Next Article हेल्दी डायटसाठी झटपट बनवा ओट्स डोसा









