कुंभोज : वार्ताहर
नेज तालुका हातकणंगले येथील पहाटेच्या सुमारास शिवारातील लाडग्यांनी हल्ला करून तारेच्या जाळीत ठेवलेल्या लहान बकऱ्यासह मेंढ्यांवर हल्ला केला. यामध्ये २ बकऱ्या ठार होउन ८ बकऱ्या जखमी झाल्या आहेत.
मेंढपाळ काशिनाथ शिवाजी नरुटे, बाबासो आण्णापा नरुटे, विठ्ठल लक्ष्मण घोदे, अण्णाप बाबू येडगे- घोदे, नेज ता. हातकणंगले जि.कोल्हापूर या सर्व मेंढपाळांच्या मेंढरांचा तळ निवृत्ती बाळू चव्हाण कुंभार मळयाजवळ , नेज यांच्या शेतात बसायला आहेत. सोमवार दि.२८/११/२०२२ रोजी पहाटेच्या सुमारास लाडग्यांनी हल्ला करून तारेच्या झाळीत ठेवलेल्या बाबासो आण्णाप्पा नरुटे यांच्या २ बकऱ्यांना ठार व ८ बकऱ्यांना गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यात मेंढपाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मेंढपाळ यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संजय वाघमोडे यांना ही घटना फोनवरून तात्काळ कळवली संजय वाघमोडे साहेब यांनी वनाधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सह घटनास्थळी हजर राहून घटनेचा पंचनामे करण्याची विनंती अधिकाऱ्याना केली. वनरक्षक मोहन देसाई यांनी घटनेचा पंचनामा केला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उदय देसाई यांनी मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन केले.
यावेळी बोलताना संजय वाघमोडे यांनी सांगितले की वन्यप्राण्यांच्या हल्याच्या घटना वारंवार घडत आहे एकामागून एक अशा घडल्याने मेंढपाळामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, वनविभागाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई अत्यंत कमी मिळते तसेच विमा कंपन्या व सरकार शेळ्या मेंढ्याना विमासंरक्षण देत नाहीत. त्यामुळे मेंढपाळ यांना अर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. चालू बाजार भावानुसार मटनाचा दर सहाशे ते सातशे रुपये किलो आहे.यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने केली.









