खारघर येथील उष्माघात मृत्यू दुर्घटनेच्या दिवशीचे तेथील कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस एवढे सांगण्यात येते. हे तापमान रबाळे येथील असून खारघर त्या †िठकाणाहून 20 ते 25 किमी लांब असल्याचे समजते. एवढय़ा परिघात स्वयंचलित हवामान केंद्र नसणे हेच मुळात दुर्दैव. हवामान केंद्र त्या दिवशीचे मृत्यू नोंद रोखू शकले नसते, मात्र दुसऱया दिवशीच्या कार्यक्रमासाठी इशाऱयाचा अंदाज तरी नक्की समजला असता. आरोग्य विषयासह हवामानशास्त्राrय बाजू देखील विचारात घेणे महत्वाचे आहे…
आठवडाभरापूर्वी 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भुषण कार्यक्रमावेळी उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आता आठवडाभरानंतरही त्यातील अद्याप माहिती येणे बाकी आहे. मृत्यू नैसर्गिक आणि अनैसर्गिक असे दोन्ही प्रकारातील असल्याचे सांगण्यात येत आहेत. नैसर्गिक मृत्यू म्हणजे निसर्ग कोपल्यामुळे म्हणजे उष्माघाताने झालेले मृत्यू तर अनैसर्गिक म्हणजे किती तरी तास पोटात अन्नाचा कण वा पाणी न गेल्याने झालेले मृत्यू. मृत्यूचे असे विश्लेषण कारण देण्यात आले असले तरी देखील राज्यात एकाच दिवशी 14 मृत्यू होणे हा प्रकार दुर्घटनेत घडतो. त्या दिवशी श्री सदस्य सकाळपासूनच उन्हात बसले होते. दरम्यान राज्य सरकारचे आरोग्य विभाग उन्हाची काहिती सुरू झाल्यावर म्हणजेच 1 मार्च पासून उष्माघातात काळजी घेण्याच्या सुचना देणे सुरुवात करते. या सुचना 31 जुलै पर्यंत लागू केलेल्या असतात. अशा कालावधीत उष्णता विकार आणि नियंत्रणासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून उपाय योजना आखण्यात येतात. संबंधित बाबतीत नियंत्रण करण्याचे काम केले जाते. तसेच सुचना आणि जागरुकता आणण्यात येते. खारघरमधील उष्माघातामुळे झालेले मृत्यू ही पहिली घटना नसून यापूर्वी देखील उष्माघाताने मृत्यू झाले आहेत. मात्र एकाच दिवशी उष्माघाताने मोठय़ा संख्येने मृत्यू होणे ही पहिलीच वेळ आहे. या कालावधीत आरोग्य विभागाने नऊ वर्षाचा उष्माघात अहवाल सांगितला. यात 2015 या वर्षात उष्माघाताच्या 28 रुग्णांची नोंद असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 2016 मध्ये उष्माघाताचे 686 रुग्ण नोंद असून 19 मृत्यू झाले. तसेच 2017 या वर्षात 297 उष्माघाताचे रुग्ण तर 13 मृत्यू दाखविण्यात आले आहे. शिवाय 2018 या वर्षात मात्र उष्माघात रुग्ण संख्या प्रचंड घटून दोनच रुग्णांची नोंद असून 2 मृत्यू दाखविण्यात आली आहे. 2019 या वर्षात उष्माघाताचे 9 रुग्ण नोंद असून 9 मृत्यू दाखविण्यात आले. तर 2020 आणि 2021 या वर्षात उष्माघाताचे रुग्ण तसेच मृत्यू दाखविण्यात आले नाहीत. (या वर्षी कोविडमध्ये आरोग्य यंत्रणा जोडली गेली होती.) तर 2022 या वर्षात मात्र 767 अशी सर्वाधिक उष्माघाताच्या रुग्णांची नोंद असून त्याच वर्षी 31 मृत्यू उष्माघाताचे आहेत. यावर्षी मृत्यूची संख्या ही सर्वाधिक आहे. दरम्यान 2022 मधील संशयित मृत्यूचे वर्गीकरण करताना नागपूर मनपा 13, जळगाव 4, अकोला 3, नागपूर ग्रामीण जालना प्रत्येकी 2, औरंगाबाद, परभणी, मनपा, अमरावती, भंडारा, उस्मानाबाद, हिंगोली प्रत्येकी 1 असे सांगण्यात आले. तर 12 एप्रिलपर्यंत राज्यात एकच उष्माघाताचा रुग्ण नोंदविण्यात आला आहे. तसेच 2023 या वर्षात 14 एप्रिल पर्यंत गडचिरोली आणि सातारा असे दोन ठिकाणी प्रत्येकी 1 म्हणजेच राज्यात दोनच उष्माघाताचे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. या आकडेवारीत 16 एप्रिल रोजी नोंद अद्याप करण्यात आली नसून ती केल्यास ही संख्या वाढलेली दिसून येईल.
दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या समन्वयाने राज्याला हिट अलर्ट दिला जातो. यात पांढरा, पिवळा, केशरी आणि लाल असे अलर्ट दिले जातात. यात पांढऱया इशाऱयात तापमान सर्वसामान्य असते. पिवळ्या इशाऱयात नेहमीपेक्षा उष्ण दिवस, केशरी अलर्टमध्ये उष्णतेची मध्यम लाट तर रेड अलर्ट मध्ये अत्यंत उष्ण दिवस असल्याचा इशारा आहे. या इशाऱयात नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 6 डिग्री सेल्सियस किंवा त्याहूनही अधिक तापमान असू शकते. असे इशारे देताना राज्य व्यवस्थापन कक्षाकडून कार्यवाही करण्यात येते. यात सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, यातही बस स्टँण्ड, रेल्वे स्टेशन बाजारपेठा धार्मिक ठिकाणी बँका पेट्रोल पंप सारख्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करणे, उन्हातील लोकांना सावलीच्या जागा निर्माण करणे, असे बऱयाच उपाय योजना केल्या जातात. खारघरमध्ये झालेल्या उष्माघाताच्या दुर्घटनेनंतर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक उन्हात उघडय़ा मैदानांवर कार्यक्रम घेण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र भुषण कार्यक्रम सोहळ्यात उष्माघातामुळे 14 जणांचे हकनाक बळी गेले. शिवाय काही जाण अद्यापही उपचाराधीन असल्याचे समजते. यावर कोणी काही भाष्य करण्यास तयार नसून मृत्यूचा आकडा आणि उपचाराधीन उष्माघाताचे रुग्ण याची संख्या अद्याप ठोस सांगितली जात नाही. एखादा रेल्वे किंवा एसटी अपघात तसेच बॉम्बस्फोट घडले तेव्हा त्याचदिवशी नसली तरी माहिती मिळे त्याप्रमाणे ती रुग्णालय बाहेर प्रदर्शित केली जात होती. खारघर दुर्घटनेच्या पहिल्याच दिवशी मृतांची संख्या सांगण्यास किंवा उपचाराधीन रुग्णांची संख्या सांगण्यास यंत्रणेतील कोणीही धजावत नव्हते. तुर्तास राज्य सरकारने मोकळ्या मैदानावरील कार्यक्रमांबद्दल मार्गदर्शक सूचना जारी केल्याचे सांगण्यात येते. कोणतीही दुर्घटना घडल्यावर पहिल्या महिनाभर त्यावर उलटसुलट चर्चा केली जाते. नंतर मात्र थोडय़ाशा निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना पुन्हा घडतात. सध्या राज्यात कडक ऊन असेपर्यंत दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत मोकळ्या जागेवर कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. खारघरमधील घटनेने उष्माघात भयावह असून विदर्भ मराठवाडा सारख्या ठिकाणीच उष्माघाताचे रुग्ण तसेच मृत्यू होऊ शकतात असे नसून निष्काळजीपणा दाखवल्यास उष्माघाताने कुठेही मृत्यू होऊ शकतात. उष्माघातामुळे होणारे मफत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण देशासाठी हिट ऍक्शन प्लान तयार करते. यात विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेची प्रमुख कामगिरी असते. या संस्थेने तयार केलेला अहवाल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सोपवला जाणार आहे. याच अभ्यासात काही महत्त्वाचे प्रश्न समोर आले असून शहरी लोकवस्तीला ते मार्गदर्शक ठरतील असे आहेत.
खारघर परिसरात हवामान केंद्र
सध्या, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुंबई परिसरात सांताक्रूझ आणि कुलाबा या दोनच ठिकाणी हवामान नोंद पेंद्र आहे. याच ठिकाणी पाऊस आणि आर्द्रता आणि कमाल-किमान तापमानाची नोंद केली जाते. दरम्यान उर्वरित वेधशाळांमध्ये फक्त पावसाची नोंद केली जाते. खारघर मधील दुर्घटनेतून जागे होऊन आता हवामानशास्त्र विभाग खारघर येथे स्वयंचलत हवामान पेंद्र (ऑटोमेटिक वेदर सेंटर) उभारण्याचा विचार करत आहे. यासाठी निधी आणि जागांची चाचपणी केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे केंद्र सुरु होईल असे एका अधिकाऱयाने सांगितले. पाऊस, आर्द्रता आणि तापमान असे तिन्ही नोंद करणारी केंद्र सांताप्रुझ आणि कुलाब्याला आहेत. अन्यथा मुंबई महानगर प्रदेशातील नवी मुंबई, पालघर ठाणे तसेच भिवंडी सारख्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे अद्यापही विचारात आहे. – अमोल राऊत








