अक्षता मूर्तींचा सहभाग : लहरीबाई यांची घेतली भेट
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या पत्नी योको किशिदा, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्या पत्नी रितु बंगा यांच्यासमवेत जी-20 च्या सुमारे 15 नेत्यांच्या पत्नींनी भारतीय कृषी संशोधन संस्थे (आयएआरआय)ला भेट दिली आहे. 1200 एकरमध्ये फैलावलेल्या आयएआरआय परिसराला भेट देत या विविध देशांच्या प्रमुखांच्या पत्नींनी भरडधान्यांचा स्वयंपाकातील होणारा वापर अनुभवला आहे. या सर्व नेत्यांच्या पत्नींचे भारतीय विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्या पत्नी क्योको जयशंकर यांनी स्वागत केले होते.
या प्रदर्शनात 18 देशांमधील भरडधान्य आणि भारतात वाढते स्टार्टअप तसेच शेतकरी उत्पादन संघटनांना (एफपीओ) दर्शविण्यात आले. या प्रदर्शनात भारताच्या कृषी क्षेत्राची गाथा दर्शविण्यात आली. याचदरम्यान प्रतिनिधींनी मध्यप्रदेशच्या महिला आदिवासी शेतकरी लहरी बाई यांची भेट घेतली लहरी बाई यांनी भरडधान्याच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लहरी बाईंनी आरएआरआय परिसरात जी-20 नेत्यांच्या पत्नींना भरडधान्याच्या शेतीबद्दलचे स्वत:चे अनुभव सांगितले आहे.









