खा . सुप्रिया सुळेंचे बांद्यात येऊन पं . मोदींवर टीकास्त्र
मयुर चराटकर
बांदा
दिल्लीवरून कोणीही यावे व महाराष्ट्रावर टपली मारून जावं हे खोके सरकारला चालत असेल. ट्रिपल इंजिन सरकार दिल्लीसमोर नमते घेते, आम्ही घेणार नाही. शेवटी महाराष्ट्राचे पण मोठं योगदान आहे.मराठी माणसाच्या हक्काच्या नोकऱ्या सुरतला घेऊन जाणाऱ्यांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बांदा येथुन दिला. पंतप्रधान मोदी साहेबांच्या सरकारने पवार साहेबांना महाराष्ट्रासह देशात शेती व राजकीय विकासात केलेल्या भरीव कामामुळे पद्मविभूषण दिलेले होते. मात्र, यांनी पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काही केले नाही अशी टीका करणे कितपत योग्य आहे. महाराष्ट्राला व देशाला पवार साहेबांच काम माहिती आहे. महाराष्ट्रात आल्यावर पवार साहेबांवर टीका नाही केली तर त्याची बातमी होत नाही. असं एक आमचं खणखणीत नाणं आहे जे गेली ७ वर्षे मार्केट मध्ये चालत त्यामुळे त्यांनी टीका केली असावी. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे कोकण दौऱ्यावर असून त्यांचे बांदा राष्ट्रवादीच्या येथे जंगी स्वागत करण्यात आले .
मागील प्रत्येक दौऱ्यात पंतप्रधानांनी राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले दिसतात. मात्र , यावेळी त्यांनी आमच्या पक्षावर भ्रष्टाचारा बाबतीत टीका केली नाही. राज्यातील खोके सरकारमुळे दिल्लीवरून नेहमी राज्यावर अन्याय होताना दिसतो. राज्यात मराठा समाजासह इतर समाजाना आरक्षण देण्यासाठी खोके सरकार अपयशी आहे. त्यांनी मराठा समाजाला फसवलं म्हणून पुन्हा आंदोलन करतात. त्यामुळे गावबंदीमधून समाजाचा संताप झालेला दिसतो असे सांगत तुम्ही आरक्षण मुद्द्यावर विशेष अधिवेशन , सर्वपक्षीय बैठक बोलवा आम्ही सदैव तयार आहोत. असे त्या म्हणाल्या . यावेळी असिफ शेख, समीर सातार्डेकर,प्रशांत पांगम, प्रीतम हरमलकर आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.









