मुंबई :
ऑक्टोबरमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी आत्तापर्यंत 94 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. आत्तापर्यंतच्या एकंदर व्यवहारांमध्ये पाहता ऑक्टोबरमध्ये बाजारामधून सर्वाधिक रक्कम काढून घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी मार्च 2020 मध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 61 हजार 973 कोटी रुपये काढून घेतले होते. समभागांचे उच्च मूल्य त्याचप्रमाणे चीनमधील समभागांमध्ये पॅकेजमुळे गुंतवणूकदारांचा वाढलेला विश्वास या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून रक्कम काढणे इष्ट मानले होते. सप्टेंबर 2024 मध्ये 57,724 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.









