वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱया दुसऱया मानांकन कुस्ती मालिका इब्राहिम-मुस्तफा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचे अव्वल मल्ल विनेश फोगट आणि बजरंग पुनिया तसेच अन्य काही मल्लांनी माघार घेतली आहे.
अलीकडेच झालेल्या झाग्रेब खुल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचे अव्वल मल्ल विनेश फोगट, बजरंग पुनिया, रवि दाहिया, दीपक पुनिया, अनशू मलिक, संगीता फोगट, संगीता मोर यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेसाठी आपण पूर्वतयारी केली नसल्याचे कारण त्यांनी दिले होते. आता इजिप्तमधील ऍलेक्झांड्रिया येथे 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱया इब्राहिम मुस्तफा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी मेरी कॉमच्या नेतृत्वाखाली निरीक्षक समितीने 27 मल्लांची निवड केली आहे.
2023 साली होणाऱया वरि÷ांच्या आशियाई चॅम्पियनशीप तसेच वरि÷ांच्या विश्व चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेसाठी मल्लांना आपल्या सिडिंगमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता इजिप्तमधील ही स्पर्धा मानांकन गुण मिळविण्यासाठी महत्त्वाची आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये फ्रिस्टाईल प्रकारात 9 पुरुष तसेच 8 महिला, ग्रीकोरोमन पद्धतीसाठी 10 मल्लांची त्याशिवाय प्रशिक्षकवर्गातील 16 प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. निवडण्यात आलेल्या भारतीय कुस्ती संघामध्ये टॉप्समधील 3 मल्लांचा समावेश आहे. 67 किलो गटात आशु, 65 किलो गटात भातेरी आणि 65 किलोवरील गटात सुजित यांची निवड करण्यात आली आहे.
इजिप्तमध्ये होणाऱया या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी केंद्रीय क्रीडा युवजन खात्याच्या निरीक्षक समितीने 27 मल्लांसह एकूण 43 जणांच्या पथकाला अधिकृत मंजुरी दिली आहे.
भारतीय कुस्ती संघ- ग्रीकोरोमन- मनजित (55 किलो), विक्रम कुऱहाडे (60 किलो), करणजित (67 किलो), नितीन (63 किलो), आशु (67 किलो), अंकित गुलिया (72 किलो), साजन (77 किलो), रोहित दाहिया (82 किलो), नरिंदर चिमा (97 किलो), नवीन (130 किलो), महिला- सुश्मा शौकिन (55 किलो), सिटो (57 किलो), सिमरन (59 किलो), सुमित्रा (62 किलो), भातेरी (65 किलो), राधिका (68 किलो), रितिका (72 किलो), किरण (76 किलो).
फ्रिस्टाईल- उदित (57 किलो), पंकज (61 किलो), सुजित (65 किलो), सागर जगलेन (74 किलो), प्रदीप (79 किलो), जाँटी कुमार (86 किलो), पृथ्वीराज पाटील (92 किलो), साहिल (97 किलो), दिनेश (125 किलो).









