मानहानीचा खटला लढणार नाहीत, मध्यस्थीचा प्रयत्न ठरले कारण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्या आणि खासदार महुआ मोईत्रा यांच्या वकिलाने शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित खटल्यातील आपले नाव मागे घेतले. सदर याचिकेमध्ये भाजप नेते आणि खासदार निशिकांत दुबे, एक वकील, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मीडिया संस्थांना मोइत्रा यांच्याविरोधात कोणतीही अवमानकारक सामग्री पोस्ट करणे, प्रसारित करणे किंवा प्रकाशित करणे थांबविण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी या खटल्यातून स्वत:ला माघार घेतल्यानंतर वकील जय अनंत देहादराई यांनी उच्च न्यायालयात सांगितले की, सीबीआयमधील मोइत्रा यांच्याविऊद्धची तक्रार मागे घेण्यासाठी शंकरनारायणन यांनी गुऊवारी रात्री फोनवरून संपर्क साधला होता.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योजकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना मोइत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी दसऱ्याच्या सुटीनंतर 31 ऑक्टोबर निश्चित केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये एकीकडे अनेक तृणमूल काँग्रेसचे नेते आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आले आहेत. तर आता पक्षाच्या लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचा तसेच सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविल्याचा आरोप झाला आहे. पैसे आणि भेटवस्तूच्या बदल्यात विदेशात स्थायिक उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या हितांसाठी संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप मोइत्रा यांच्यावर झाला आहे. मोइत्रा यांच्यावर झालेला आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. 2005 मध्ये अशाच एका प्रकरणात अनेक खासदारांना सदस्यत्व गमवावे लागले होते. आता या नवीन प्रकरणात फायरब्रँड प्रतिमा तयार करणाऱ्या महुआ मोइत्रा या प्रत्यक्षात पैसे घेऊन प्रश्न विचारणाऱ्या निघाल्या. हा केवळ संसदेचा अवमान नसून विशेषाधिकाराचे उल्लंघन देखील असल्याचा दावा खासदार दुबे यांनी केला आहे.
…तर मोइत्रा यांना समन्स शक्य!
लोकसभा एथिक्स पॅनेलचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी शुक्रवारी सांगितले की, महुआ मोइत्रा यांच्याविरोधात व्यापारी दर्शन हिरानंदानी यांचे पत्र मिळाले आहे. महुआ मोइत्रा हिरानंदानी समूहाला अदानी समूहाबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. आता मोईत्रा यांच्यावरील आरोपांची शहानिशा करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदाराला 26 ऑक्टोबरला बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









