सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी त्यांच्यावर राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील अनेकानी शुभेच्छांचा वर्षाव केला.
तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक मंत्री, राज्यभरातील आमदारांनी शेखर निकम यांना भ्रमणध्वनीव्दारे शुभेच्छा दिल्या.

यावेळी वाढदिवसानिमित्ताने भिले शाळेला संगणक संच भेट , सायकल वाटप आणि देवरुख येथील सह्याद्री संकल्प सोसायटीला सह्याद्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.










