पोलिसांनी उचलले पाऊल
अमेरिकेच्या मिनेसोटामध्ये गंभीर स्वरुपात जखमी मुलगा रुग्णालयात लाइफ सपोर्ट सिस्टीमवर होता, त्याला पोलीस अधिकारी करण्यात आले आणि त्याची शपथ देण्यात आली. कारण या मुलाची ही अंतिम इच्छा होती. हा मुलगा मोठेपणी पोलीस अधिकारी होऊ इच्छित होता. याचमुळे पोलीस विभागाने त्याची अंतिम इच्छा पूर्ण करत एका पोलीस अधिकाऱ्याची मानद उपाधी दिली. याच्या काही वेळानंतरच त्याचे व्हेंटिलेटर हटविण्यात आले.
पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न
सार्टेल पोलीस विभागाने राघव श्रेष्ठ नावाच्या मुलाला पोलीस अधिकाऱ्याचा बॅज देत औपचारिक स्वरुपात विभागाचा एक मानद सदस्य घोषित पेले. काही दिवसांपूर्वी एका रस्ते अपघातानंतर हृदयाघात झाल्याने राघवला हेनेपिन काउंटी मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. राघव नेहमीच मोठेपणी पोलीस अधिकारी होऊ इच्छित होता हे कळल्यावर आमची टीम त्याच्या भेटीसाठी गेली आणि त्याच्या परिवारासमोर त्याला शपथ देण्यात आल्याचे सार्टेल पोलीस प्रमुख ब्रँडन सिलगजॉर्ड यांनी सांगितले आहे.
सायकल चालवताना अपघात
भारतीय वंशाचा 12 वर्षांचा राघव श्रेष्ठ सार्टेलच्या सेंट स्टीफन्स मिडल स्कूलमध्ये सातवीत शिकत होता. नॉर्थसाइड पार्कमध्ये सायकल चालवताना एका टेकडीवरून खाली येताना त्याचा अपघात झाला होता. हेल्मेट परिधान केलेले असले तरीही त्याच्या डोक्याला गंभीर ईजा झाली आणि ज्यानंतर हृदयाघात झाला होता.
करण्यात आले होते एअरलिफ्ट
राघवच्या एका मित्राने त्वरित पोलिसांना कळविले, परंतु अचूक ठावठिकाणा सांगता आला नाही. यादरम्यान तेथून जाणाऱ्या एका इसमाने पोलिसांना लोकेशनची पुष्टी दिली आणि राघवला सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्याला गंभीर अवस्थेत मिनियापोलीस रुग्णालयात एअरलिफ्ट करण्यात आले. जेथे त्याची प्रकृती आणखी बिघडली. गुरुवारी त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते. यानंतर पोलीस विभागाला मुलाची अंतिम इच्छा कळली असता रुग्णालयात पोहोचून त्याला एका अधिकारीपदाची शपथ देण्यात आली. मग व्हेंटिलेटर सपोर्ट हटविण्यात आला आणि काही वेळानंतर राघवचा मृत्यू झाला.
पोलिसांकडू फंडरेजर
राघवच्या शोकाकुल परिवारासाठी सार्टेल पोलीस विभाग आणि कम्युनिटीने फंडरेजर सुरू केले आहे. याच्या माध्यमातून आतापर्यंत 36000 डॉलर्स जमविण्यात आले आहेत.









