काम करत असताना विज पोलाला वायरमन चिकटला
कुडाळ ; प्रतिनिधी
येथील गवळदेव जवळील अभिमन्यू हाँटेल समोरील विजवितरण कंपनीच्या पोलवर काम करीत असताना विजवितरण कंपनीचा कर्मचारी धंनजय फाले ( सध्या रा पिंगुळी शेटकरवाडी मुळ रा. महादेवाचे केरवडे) हा विद्युत शाँक लागून पोलवरच चिकटून राहीला. त्यानंतर वीज पूरवठा बंद करण्यात आला . विजवितरणचे कर्मचारी .एम . आय . डी . सी अग्नीशमन दल व नागरीकांच्या मदतीने पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर त्याला पोलवरुन सुरक्षित खाली ऊतरविण्यात आले .त्यानंतर त्याला अँब्युलन्सने जिल्हा रुग्णालय ओरोस येथे नेण्यात आले. फाले यात गंभीर जखमी झाला आहे . भाजलाही आहे . शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी मोठ्या संख्येने नागरीकांनी गर्दी केली होती. विजवितरणकडे कोणतीही आपत्कालीन व्यवस्था नाही हे या निमित्ताने समोर आले . विजवितरणकडे मोठ्या शिड्या झाडकटर व अन्य व्यवस्था नसल्याने फाले यांच्यावर पाऊण तास पोलवर लोंबकळत रहाण्याची वेळ आली. विजमित्र लवकर बरा होऊन घरी येऊदे अशी प्रार्थना उपस्थित हजारो लोक करीत होते.









