रत्नागिरी :
तालुक्यातील निवळी शिंदेवाडी येथे रान साफ करताना जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून झालेल्या दोघांच्या मृत्यूप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संबंधित वायरमनवर गुन्हा दाखल केला आह़े दिलीप भिकाजी मायंगडे (ऱा भोके-रत्नागिरी) असे या वायरमनचे नाव आह़े कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचा अहवाल महावितरणकडून पोलिसांना पाठविण्यात आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल़ी दरम्यान महावितरणकडून संबंधित शाखा अभियंता व वायरमन मायंगडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आह़े.
विदुलता वासुदेव वाडकर (61) व चंद्रकांत यशवंत तांबे (43, ऱा निवळी शिंदेवाडी, रत्नागिरी) यांचा 17 जुलै रोजी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होत़ा विदुलता वाडकर यांच्या घराकडे जाणारी विजेची तार पडल्याने त्यांच्या घरी अंधार झाला होत़ा याप्रकरणी त्यांनी महावितरणकडे तक्रार दाखल केली होत़ी मात्र विद्युत प्रवाह बंद न करता महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज वाहिनीची वाट साफ करून घ्या असे विदुलता यांना सांगितले होत़े विदुलता यांनी गावातील चंद्रकांत तांबे यांना रान साफ करण्यासाठी बोलावले होत़े
17 जुलै रोजी सकाळी चंद्रकांत हे वसंत मुळये यांचे आंबा बागेत रान साफ करत असताना त्यांना विद्युतभारीत तारेचा धक्का लागल़ा जीव वाचविण्यासाठी चंद्रकांत यांनी धडपड केल़ी मात्र वीजेची तार चंद्रकांत मानेला चिकटली होत़ी यातच चंद्रकांत यांचा मृत्यू झाल़ा चंद्रकांत यांची धडपड पाहून विदुलता या चंद्रकांत यांना वाचविण्यासाठी पुढे आल्या असता त्यांनादेखील विजेचा जोरदार धक्का बसला व त्यांचा मृत्यू झाल़ा दोघांचेही मृतदेह लागूनच पडले होत़े
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी संबंधित ठिकाणची जबाबदारी असणारे वायरमन व इतर जबाबदार कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होत़ी तसेच ही सर्व घटना घडण्यामागचे कारणदेखील मागविण्यात आले होत़े महावितरणकडून यासंबंधी पोलिसांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्याठिकाणची जबाबदारी ही वायरमन दिलीप मायंगडे यांची होत़ी त्यांनीच विदुलता यांना रान साफ करून घेण्यास सांगितल़े तसेच विजेची तार पडली आहे हे माहिती असूनही त्याठिकाणचा विद्युत प्रवाह बंद केला नाह़ी असा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला.
- वायरमन व शाखा अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस
महावितरणकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार, संबंधित ठिकाणी विद्युत तारेच्या देखभाल दुऊस्तीचा अभाव असल्याचे आढळून आल़े तसेच तार लुटलेल्या ठिकाणी स्पेसेस गार्ड लूप तार बसविण्यात आली नव्हत़ी तारेच्या वरती असलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आलेल्या नव्हत्या, असे महावितरणच्या अहवालात आढळून आले आह़े त्यानुसार महावितरणकडून संबंधित शाखा अभियंता व वायरमन मायंगडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आह़े








