मुंबई :
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोचे समभाग सोमवारी शेअरबाजारात 10 महिन्याच्या उच्चांकावर पोहचले आहेत. गेल्या दोन दिवसात विप्रोचा समभाग 7 टक्के इतका तेजीत राहिला आहे. बीएसईवर सोमवारी कंपनीचे समभाग 4 टक्के वाढत 420 रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीचा तिमाही अहवाल नुकताच जाहीर झाला असून जूनअखेरच्या तिमाहीत निव्वळ नफा 12 टक्के वाढीसह 2870 कोटी रुपयांवर पोहचला आहे.









