बेंगळूर :
संजीव जैन यांना विप्रो कंपनीने सीओओपदी नियुक्त केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या पदावर कार्यरत असणाऱ्या अमित चौधरी यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर कंपनीने लागलीच तात्काळपणे संजीव जैन यांची या पदावर नियुक्ती जाहीर केली आहे.
अमित चौधरी यांनी इतर कंपन्यांमध्ये नोकरी शोधण्याकरिता वैयक्तिकरित्या राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. मे अखेरपर्यंत ते आपल्या पदावर असतील.
या अगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) थिअरी डेलापोर्टे आणि आणि मुख्य वित्त अधिकारी जतीन दलाल यांनीसुद्धा राजीनामा दिला होता. नव्याने सीओओ (चिफ ऑपरेटिंग ऑफिसर)पदी निवड झालेले संजीव जैन हे 2023 मध्ये विप्रोमध्ये सामील झाले होते. विविध संघांचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना आहे.









