Winter Special Spinach Soup : थंडीच्या दिवसात जेवणात वेगवेगळे पदार्थ खायला आवडतातच शिवाय गरमा-गरम सूप पिण्याचे देखील शौकिन खूप असतात. या दिवसात अनेक प्रकारचे सूप बनवून पिले जातात. थंडीच्या दिवसात अनेकांना सतत सर्दीचा त्रास होतो. अशावेळी खाण्य़ात थोडा बदल असावा अशी इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला पालक सूप याविषयी रेसीपी सांगणार आहोत. जे सूप प्यायलाही टेस्टी आहे आणि पोष्ठिकसुध्दा.शिवाय पालकामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यापासून ब्लड प्रेशर नॉर्मल होण्यापर्यंत त्याचा फायदा होतो.
साहित्य
पालक -2 वाटी
कांदा-1
लसूण पाकळ्या- 4
मिरची -1
काळी मिरी-7 ते 8
लवंग-1
डालचिनी-एक तुकडा
तूप- 1 चमचा
कृती
सुरवातीला पालक चिरून घ्या. त्यानंतर एका कढईत एक चमचा तूप घाला. त्यात लसणाचे तुकडे घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा घाला. आता त्यात लवंग,डालचिनी, काळी मिरी याची बारिक पूड करून त्यात घाला. थोड परतून घेतल्यावर त्यात आता पालक घाला. पालक परतून घेतल्यावर त्यात थोड पाणी घालून शिजवून घ्या. पालक थोडा शिजल्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्या. आता केलेली पेस्ट शिजवून घ्या. यानंतर त्यात अर्धी वाटी दुध घाला. आता दोन्ही थोड शिजवून घ्या. यात तुम्ही घरातील शाई किंवा क्रिम घालून सर्व्ह करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









