जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी किंवा पदार्थ सजवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. पण कोथिंबिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म तसेच पोषक तत्वे असतात. त्यामुळे कोथिंबिरीचा आहारात जास्तीत जास्त केलेला वापर फायदेशीर ठरतो. म्हणूनच आज आपण कोथिंबीरीच्या पराठ्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य :
२ वाट्या गव्हाचे पीठ
पाव वाटी बेसन पीठ
१ चमचा लाल तिखट
१ चमचा धने जिरे पुड
अर्धा चमचा हळद
२ वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर
१ चमचा ओवा
१ चमचा दही
मीठ
पाणी
तेल
कृती :
सर्वप्रथम एका परातीमध्ये गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ घ्या. यानंतर त्यामध्ये लाला तिखट, धने-जिरे पूड, हळद,चवीनुसार मीठ,ओवा हे सर्व जिन्नस घाला. आणि सर्व पीठ हाताने एकजीव करून घ्या. यानंतर यामध्ये धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर ,दही आणि आले लसूणाची पेस्ट घाला. आत्ता सर्व पीठ एकत्र करून त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मऊसर मळून घ्या. आत्ता मळलेले पीठ १५ मिनटे ओल्या कापडाने झाकून ठेवा. यानंतर पिठाचे गोळे करून ते चपातीप्रमाणे लाटून घ्या.आणि तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी भाजून घ्या. तयार झालेले स्वादिष्ट कोथिंबीरीचे पराठे दही, शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









