Winter Special Food : रोज भाजी कोणती बनवायची असा प्रश्न महिलांना नेहमीच सतावतो. त्यात भाजी आणि रसभाजी करायची असल्याने रोज वेगळे काय कराय़चे याचा विचार करावा लागतो. तुम्हाला नियमित जेवणात वेगळेपणा आणायचा असेल आणि खूप भूक लागल्यानंतर रसभाजी बनवायची असेल तर मटार-पनीर भाजी बनवू शकता. अगदी 10 मिनिटात हि भाजी कशी बनवायची चला जाणून घेऊया.
साहित्य
हिरवा वटाणा-अर्धी वाटी
कांदे-2
लसून-5 ते 6
दोन टोमॅटो-3
हिरव्य़ा मिरच्या-4
पनीर -अर्धी वाटी
काजू-4 ते 5
अद्रक- पाव इंच
साहित्य
एका पातेल्यात सर्व साहित्य एकत्र करा. त्यात एक ग्लास पाणी घ्या. गॅसवर मंद आचेवर 10 मिनिटे शिजवून घ्या. आता कांदा, टोमॅटो,लसून, मिरची, काजू यांची पेस्ट करून घ्या. आता कढईत 2 चमचे तेल घाला. तेल चांगले गरम झाले की त्यात जिरे घाला. यानंतर तयार केलेली पेस्ट घाला. आता त्यात गरम मसाला, लाल तिखट, कसुरी मेथी घाला. झाकण ठेवून मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. मसाला चांगला भाजला की त्य़ात वटाणा पाण्यासहित घाला. पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्या.त्यात आता पनीरचे तुकडे घाला . भाजी चांगली मिक्स करून घ्या. गरज वाटल्यास थोडे पाणी घाला . यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडी कसुरी मेथी घालून शिजवून घ्या.आता तयार झालेली भाजी एका बाऊलमध्ये घेवून सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









