Winter Skin Care : थंडीत चेहरा, संपूर्ण बाॅडी कोरडी पडत असते.तुम्ही जर नियमित काही गोष्टींच पालन केलत तर मात्र तुम्हाला थंडीत स्किनसाठी वेगळी ट्रिटमेंट घ्यावी लागणार नाही. तुम्ही ऑफिस वर्क करत असाल तर तुम्हाला स्किनची खूपच काळजी घ्यावी लागते. यासाठी आज काही टिप्स देणार आहोत ज्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. कोणत्या चला जाणून घेऊया.
-क्लिंझर कोणत वापराव
थंडीच्या दिवसात स्किन खूप ड्राय होते. त्यामुळे या दिवसात ऑईल बेस क्लिझर वापरा. मेकअप काढण्यासाठी तुम्ही असे क्लिंझर वापरा. यामुळे स्किन ड्राय होणार नाही.
-फेशवाॅश
थंडीत विशेषत:जेल किंवा क्रिमबेस फेशवाॅश वापरा. यामुळे स्किन ड्राय होणार नाही आणि PH बॅलेन्स राहिल. याशिवाय ज्यांची स्किन खूपच ड्राय आहे आणि जे लोक फेशवाॅश वापरत नाहीत अशांनी थोडी शाय किंवा दुध, हळद आणि बेसनपीठ वापरा. याने स्किन क्लिअर होईल आणि ड्राय होणार नाही.
-स्क्रब
हिवाळ्यात शक्यतो स्क्रब जादा करू नका. आठवड्यातून एकदा स्क्रब करा. यासाठी घरातील काॅफीचे स्क्रब वापरा. यासाठी काॅफीत ऑलिव्ह ऑईल, बेबी ऑईल, किंवा तिळाचे ऑईल मिक्स करा.
-टोनर
तुम्ही नियमित टोनरचा वापर करत असाल तर तुम्ही टोनर घरी देखील बनवू शकता.तुम्ही घरीदेखील टोनर बनवू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात थोडी तुळशीची पाने,पुदीना घाला. हे पाणी चांगले उखळा. यानंतर पाणी गाळून ते फ्रिजमध्ये ठेवा.दुसरा टोनर बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात गावठी गुलाबाची पाने उकळून घ्या. हे पाणी देखील तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता.कोणत्याही कंपनीची गुलाब पाणी वापरू शकता. असच टोनर तुम्ही ग्रीन टीचही बनवू शकता.
-माॅइश्चरायझर
ऑॅईल बेस माॅश्चराझर वापरा. स्किन टोननुसार वापरा.सोबत सनस्क्रिमदेखील वापरा.
-लिपबाम
लिपबाम वापरताना एसपीएफ असलेला वापरा.तुम्हाला जे लिपबाम सुट होत ते वापरा. बाजारात लिपस्टिक शेडमध्ये लिपबाम मिळते तेही वापरू शकता.
-बाॅडीकेअर
थंडीच्या दिवसात केवळ हातच नाही तर संपूर्ण शरीर ड्राय पडते यासाठी तुम्ही आंघोळीच्या आधी अंगाला तेल लावा. शिवाय अंघोळीनंतर बाॅडीला माॅइश्चरायझर लावा. यामुळे स्किन ड्राय पडणार नाही आणि दिवसभर स्किन छान राहिलं.
-फेशिअल ऑईलचा वापर करा
चेहऱ्या साठी फेशिअल ऑईलचा वापर करा. मेकअपपूर्वी देखील फेशिअल ऑईल वापरू शकता. सोबतच भरपूर पाणी प्या.
Previous Articleराज ठाकरेंनी घेतली इतिहास अभ्यासक मेहेंदळेंची भेट
Next Article परशुराम घाट बंद करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध!









