प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबर दरम्यान बेळगावात होण्याची शक्मयता आहे. बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे हिवाळी अधिवेशन घेण्याबाबत विभानसभेचे सभाध्यक्ष यू. टी. खादर आणि विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी चर्चा केल्याचे समजते. यासंदर्भात सभाध्यक्ष आणि सभापतींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशीही सल्लामसलत केल्याचे कळते. बेळगाव जिल्हा प्रशासनासाठी आवश्यक तयारी सुरू करण्याचे निर्देश सभाध्यक्ष आणि सभापतींनी विधानपरिषद आणि विधानपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









