Boost Immunity : हिवाळा सुरु होताच सर्दी- खोकला असे आजार पसरायला सुरुवात होतात. या दिवसात विषाणूजन्य आणि संसर्गाचा धोका जास्त वाढत असतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना रोगांचा सर्वाधिक त्रास होतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला प्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल, तर सामान्य चहाऐवजी दिवसातून 1-2 वेळा हर्बल चहा प्या.यामुळे पोटाच्या समस्या दूर होतील आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होईल.हर्बल टी तुम्ही घरी सहज बनवू शकता. कसे तयार करायचे याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेवूया 5 हर्बल टी कशा तयार करायच्या.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी रोज दालचिनीचा चहा प्या. यामुळे पचनक्रिया सुधारेल आणि लठ्ठपणा कमी होईल. दालचिनी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. सकाळी दालचिनीचा चहा प्यायल्याने मेटाबॉलिज्म चांगले राहते.

तुम्ही फुलांच्या मदतीने हर्बल टी बनवू शकता. जास्मीनमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात जे फ्री रॅडिकल्स कमी करतात. यामुळे लठ्ठपणा कमी होतो. जेवणानंतर जास्मिनचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

हिवाळ्यात जेवणात जायफळचा वापर जरूर करावा. चिमूटभर जायफळ तुमची सर्दीची समस्या दूर करण्यास संजीवऩी सारखी काम करते. तुम्ही जायफळ चहा बनवून पिऊ शकता.यासाठी उकळत्या पाण्यात १ चिमूट जायफळ पावडर टाका.पाणी काही वेळ उकळवा आणि नंतर ते गाळून प्या. जेवल्यानंतर एक तासानंतर तुम्ही जायफळ चहा पिऊ शकता.यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

हे लाल फूल एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. लाल फुलापासून बनवलेला चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे हृदयविकार टाळण्यास मदत होते. हिबिस्कस चहा प्यायल्यानेही वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

तुळशीच्या पानांचा चहा देखील रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास आणि सर्दी आणि खोकला दूर करण्यास मदत करतो. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि मेटाबॉलिज्म वाढते. तुळशीची पाने लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करतात. हे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते आणि सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करते. तुम्ही रोज तुळशीची पाने टाकून चहा प्या. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.









