Winter Home Remedies : परतीच्या पावसानंतर कालपासूनच थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीसाठी वापरणारी कपडे एव्हाना आईनी काढून ठेवली असतीलही. स्वेटर, वेगवेगळे स्कार्प, जॅकेट, हात मोजे, पाय मोजे यांची जुळवाजुळव आता करावी लागेल. एवढ परीधान करूनही अनेकांना थंडी खूप जाणवते. घरात वयोवृध्द असतील तर त्यांना ही थंडीने पोठात गोळ यायला लागतो. अशावेळी नेमकी कोणती काळजी घ्यायची याची माहिती घेवूया. जस-जस वय वाढत जाते तसे आपला मेटाबाॅलिझम कमी व्हायला लागतो. यामुळे देखील थंडी वाजायला सुरुवात होते. अनेक आजारात देखील थंडी वाजत असते. अवेळी वाजणारी थंडी किंवा इतरांपेक्षा जादा थंडी वाजत असेल तर यावर उपाय काय करायचे हे जाणून घेऊया.
गरम जेवण घ्या
थंडीच्या दिवसात चहा, काॅफी या गरम पेयावर आपण भर देतो. पण चहा पिऊन झाल्यावर परत थोड्या वेळाने थंडी वाजायला सुरुवात होते. केवळ चहाच नाही तर या दिवसात जेवण ही गरम-गरम खाल्ले पाहिजे. तुम्हाला ऑफिसमुळे सकाळी खायला जर वेळ मिळत नसेल तर किमान रात्रीचे जेवण गरम घ्या. शेंगदाणे, ड्रायफुट देखील मधल्या वेळेत खा.यामुळे पोटोत गोळा येणार नाही.
काॅटनचे कपडे वापरा
थंडीत रात्री स्वेटर घालून झोपायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही काॅटनच्या कपड्यांना पसंदी द्या.सोबत जीन्सची कपडेही वापरू शकता. बाजारात जीन्स टी-शर्ट, जॅकेटच्या अनेक व्हारायटी तुम्हाला पाहायला मिळतील. याचबरोबर तुम्ही रात्री झोपताना पायात साॅक्सचा वापर करा. यामुळे पायाला उबदारपणा येतो.पायाला थंडी वाजत नाही. तुम्हा दिवसभरही साॅक्स वापरू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









