Winter Food Bajra Khichdi: सध्या थंडीला सुरुवात झाली आहे. या दिवसात गरम-गरम आणि पोष्ठिक असं खाद्य पदार्थ बनवले जातात. ज्या ठिकाणी थंडी जादा असते त्याठिकाणी उष्ण असे पदार्थ बनवण्यावर भर दिला जातो. या हिवाळ्यात तुम्हाला टेस्टी आणि हेल्ही अशी बाजरीची खिचडी कशी बनवायची हे सांगणार आहोत. जी पोष्टिक ही असेल आणि तुमचं पोटही भरेल. चला तर जाणून घेऊया रेसीपी.
साहित्य
बाजरी- 4 वाटी
मुगडाळ- 1 वाटी
हिरवा ओला वटाणा- पाऊण वाटी
बिन्स-पाऊण वाटी
गाजर-पाऊण वाटी
कांदे- 3
टोमॅटो-3
हिंग-पाव चमचा
हळद-पाव चमचा
जिरे-पाव चमचा
मोहरी-पाव चमचा
लाल तिखट- 2 चमचे
मिरची-3
आल्ले-लसूण पेस्ट-1 चमचे
कृती
सुरुवातीला कुकरमध्ये फोडणी करून घ्या. यासाठी गॅस मंद आचेवर ठेवा. त्यात दोन चमचे तुप आणि दोन चमचे तेल घाला. तेल-तुप चांगले तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की त्य़ात जिरे , हिंग, हळद, कापलेली मिरची घाला. यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा गुलाबी रंगावर भाजत आला की त्यात आल्ले-लसूण पेस्ट,टोमॅटो घाला. टोमॅटो चांगले भाजले की त्य़ात लाल तिखट घाला. हे मिश्रण चांगले तयार झाले की त्यात भिजवलेली बाजरी आणि मुगडाळ घाला. याला चांगले परतून घ्या. पुन्हा दोन चमचे गरम मसाला घाला. यानंतर बिन्स, गाजर, वटाणा, चवीनुसार मीठ घाला पुन्हा मिश्रण परतून घ्या. आता बाजरी भिजेल एवढे पाणी अॅड करा. कुकरचे टोपण बंद करून चार शिट्या काढून घ्या. कुकर गार झालानंतर एका सर्व्हिंग बाऊलमध्ये ही खिचडी काढून त्यावर तुप घालून गरम-गरम खायला द्या.
टिप- चार तास बाजरी आणि मुगडाळ भिजवून घ्या.तुम्ही बाजरी मिक्सरमधून पेस्ट करून घेवू शकता किंवा तसेच वापरू शकता.
Previous Articleआयुर्वेद इस्पितळ ही केंद्राची सर्वात मोठी भेट
Next Article ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ ला सुवर्णमयुर









