खानापूर प्रो कबड्डी स्पर्धेला उदंड प्रतिसाद : प्रेक्षकांची मोठी गर्दी
वार्ताहर /खानापूर
खानापूर येथील मलप्रभा क्रीडांगणावर अंजली निंबाळकर फौंडेशनच्या वतीने गुरुवार पासून प्रो कबड्डी स्पर्धा होत आहे. यास कबड्डी स्पर्धेला नामवंत संघांसह प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
शुक्रवारी महिला कबड्डी स्पर्धेत ताराराणी पियू कॉलेज खानापूर विरुद्ध पाटील संघ चन्नेवाडी यांच्यात सामना झाला. यामध्ये खानापूर संघाने विजय मिळविला. तर अन्य एका मैदानावर चोर्ला संघाविरुद्ध भोसगाळी संघाचा सामना झाला. यामध्ये चोर्ला संघाने विजय मिळवला.
पुरुष गटातील कबड्डी सामन्यामध्ये विद्यानगर खानापूर विरुद्ध करंबळ संघात सामना झाला. त्यामध्ये करंबळ संघाने विजय मिळविला. तर दुस्रया सामन्यात मास्केनटी विरुद्ध गर्बेनहटी असा सामना रंगला त्यामध्ये गर्बेनहटी संघाने विजय मिळवला. तर चन्नेवाडी विरुद्ध माचीगड संघात झालेल्या सामन्यात चन्नेवाडी संघाने विजय मिळवला आहे. रात्री उशिरापर्यंत सामने सुरूच होते.
खानापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा अंजलीताई फाउंडेशनच्या वतीने कबड्डी सामन्यापूर्वी विशेष सत्कार करण्यात आला.









