ऑपरेशन सिंदूरमध्ये दिले महत्त्वाचे योगदान
प्रतिनिधी/ मडगाव
गोन्सुवा-बेताळभाटी येथील सुकन्या विंग कमांडकर मारिया इस्मेनिया सांचा परेरा हिने जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वपूर्ण अशी एटीसी भूमिका बजावली होती. त्याची दखल घेऊन तिला ‘मेन्शन-इन-डेस्पॅच’ देऊन सन्मानित केले आहे. विंग कमांडकर मारिया इस्मेनिया सांचा परेरा युद्धकाळातील इतिहासात सन्मानित होणाऱ्या पहिल्या गोव्यातील महिला ठरल्या आहेत. त्यांनी आयएएफच्या हल्ल्यांना आणि सुरूवातीच्या इशाऱ्यांना मार्गदर्शन करणारी माहिती दिली होती. त्यांना ऑपरेशन सिंदूरमधील कामगिरीसाठी गौरविण्यात आल्याने, तिचे मान्यवरांनी कौतुक केले आहे. गोव्यासाठी ही गौरवास्पद गोष्ट असल्याचे म्हटले आहे.









