वृत्तसंस्था/ सेंट जोन्स (अँटिग्वा)
त्रिनेदादमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी विंडीज क्रिकेट मंडळाने 13 जणांचा संघ जाहीर केला आहे. दरम्यान पहिल्या कसोटीत खेळलेल्या संघामध्ये नवोदित फिरकी गोलंदाज केविन सिंक्लेयरचा समावेश केला आहे.
सदर कसोटी सामना येत्या गुरुवारपासून येथील क्विन्स पार्क ओवल मैदानावर खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने दुबळ्या विंडीजचा डावाने पराभव करत केवळ तीन दिवसात विजय नोंदवला होता. दुसऱ्या कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या विंडीज संघामध्ये रिफेरला वगळण्यात आले असून त्याच्या जागी फिरकी गोलंदाज सिंक्लेयरला समावेश करण्यात आला आहे.
विंडीज संघ : क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), ब्लॅकवूड (उपकर्णधार), अॅथनेझ, टी. चंद्रपॉल, कॉर्नवॉल, जोशुआ डिसिल्वा, गॅब्रियल, होल्डर, जोसेफ, मॅकेन्झी, रॉच, सिंक्लेयर आणि वॉरिकन.









