वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने आगामी संयुक्त अरब अमिरात दौरा तसेच विश्वचषक क्वालिफायर्ससाठी संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक शाय होप करेल. संघात अष्टपैलू किमो पॉल व गुदाकेश मोटी यांचे पुनरागमन झाले आहे. मात्र, आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करत असलेल्या शिमरन हेटमायरला मात्र संघात जागा मिळू शकली नाही.
विश्वचषकासाठीची पात्रता फेरी 18 जूनपासून झिम्बाब्वे येथे सुरु होईल. तत्पूर्वी, वेस्ट इंडिज संघ युएईविरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल. त्यानंतर दहा संघांच्या या स्पर्धेत सहभागी होईल. या संघात अष्टपैलू किमो पॉल व गुदाकेश मोटी यांना तब्बल वर्षभरानंतर पुनरागमन करण्याची संधी मिळाली. याचवेळी टी-20 विश्वचषकादरम्यान बेशिस्त वागणूक केलेल्या शिमरन हेटमायरला यावेळी देखील संघात स्थान मिळाले नाही. वनडे विश्वचषकाच्या पात्रता फेरीत एकूण 10 संघ सहभागी होतील. यामध्ये आयर्लंड, नेदरलँड, यूएई, श्रीलंका, नेपाळ, स्कॉटलंड, ओमान, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज आणि यूएसए या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. दोन वेळा विश्वचषक जिंकलेल्या वेस्ट इंडीज संघावर प्रथमच अशा पद्धतीने पात्रता फेरी खेळण्याची वेळ आली आहे.
वर्ल्डकप क्वालिफायर्ससाठी वेस्ट इंडिज संघ- शाय होप (कर्णधार), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), शामराह ब्रूक्स, यानिक कॅरिया, केसी कार्टी, रोस्टन चेस, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, गुदाकेश मोटी, कीमो पॉल, निकोलस पूरन (यष्टीरक्षक) आणि रोमारियो शेफर्ड.









