विंडीज क्रिकेटने जाहीर केला दौरा कार्यक्रम
वृत्तसंस्था/ सेंट जॉन्स, अँटिग्वा
येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा कार्यक्रम विंडीज क्रिकेटने जाहीर केला असून या दौऱ्यात तीन वनडे व पाच टी-20 सामन्यांच्या मालिका होणार आहेत. या मालिकांची सुरुवात अँटिग्वातील सामन्याने होणार आहे.
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार असून पहिले दोन सामने अँटिग्वामध्ये तर तिसरा व शेवटचा सामना बार्बाडोस येथे खेळविला जाणार आहे. याच ठिकाणी टी-20 मालिकेचा पहिला सामना होईल. ग्रेनाडामध्ये दुसरा व तिसरा तर त्रिनिदादमध्ये चौथा व पाचवा सामना खेळविण्यात येईल. जून 2024 मध्ये कॅरिबियन बेटांवर टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असून त्याच्या तयारीसाठी ही मालिका त्यांना उपयुक्त ठरणार आहे.

विंडीजने इंग्लंडविरुद्धच्या मालिकांचे जाहीर केलेले वेळापत्रक :
डिसेंबर 3 पहिला वनडे सामना अँटिग्वा
डिसेंबर 6 दुसरा वनडे सामना अँटिग्वा
डिसेंबर 9 तिसरा वनडे सामना बार्बाडोस
डिसेबर 12 पहिली टी-20 लढत बार्बाडोस
डिसेंबर 14 दुसरी टी-20 लढत ग्रेनाडा
डिसेंबर 16 तिसरी टी-20 लढत ग्रेनाडा
डिसेंबर 19 चौथी टी-20 लढत त्रिनिदाद
डिसेंबर 21 पाचवी टी-20 लढत त्रिनिदाद.









