अफगाणिस्तान/ वृत्तसंस्था
ग्रोस आयलेट (सेंट लुसिया)
यजमान वेस्ट इंडिज आणि बरीच सुधारणा केलेले अफगाणिस्तान त्यांच्या अंतिम गट सामन्यात आज मंगळवारी एकमेकांशी भिडतील तेव्हा सुपर एट टप्प्याच्या दृष्टीने गती मिळविण्याचा प्रयत्न करतील. पापुआ न्यू गिनीविऊद्धच्या विजयाने सुऊवात केल्यानंतर वेस्ट इंडिज हळूहळू पण स्थिरपणे आपली लय शोधत गेला असून त्यांनी युगांडा आणि न्यूझीलंडवर मात केलेली आहे.
दुसरीकडे, अफगाणिस्तानने आतापर्यंत निर्दोष मोहीम राबवली आहे. रशिद खानचा संघ कॅरिबियन खेळपट्ट्याच्या स्थितीचा आनंद घेत आहेत. सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज (167 धावा) आणि वेगवान गोलंदाज फझलहक फाऊकी (12 बळी) हे सध्या फलंदाजांच्या आणि यष्टिरक्षकांच्या क्रमवारीत आघाडीवर आहेत. गुरबाजच्या व्यतिरिक्त अनुभवी इब्राहिम झद्रानने देखील 114 धावा काढत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. परंतु अफगाणिस्तानच्या संघात अनेक उजव्या हाताने खेळणारे फलंदाज असून त्यांचा डावखुरे फिरकीपटू अकेल होसेन आणि गुडाकेश मोती यांच्याविऊद्ध कस लागेल.
अफगाणिस्तानचा संघ स्वत: ऑफस्पिनर मुजीब उर रहमानशिवाय उतरेल, जो बोटाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तथापि, त्यांच्याकडे कर्णधार रशिद आणि तऊण नूर अहमदसारखे गोलंदाज असल्याने त्यांना फिरकी गोलंदाजांची कमतरता नाही. डॅरेन सामी नॅशनल स्टेडियमची खेळपट्टी सर्वोत्तम खेळपट्ट्यांपैकी एक आहे. आतापर्यंत येथे खेळलेले दोन्ही सामने भरपूर धावसंख्येचे ठरले आहेत आणि रविवारी श्रीलंकेने 200 पेक्षा जास्त धावसंख्या येथे उभारली. मोठ्या धावसंख्येच्या शोधात असलेले वेस्ट इंडिजचे धडाकेबाज फलंदाज या स्थितीचा आज फायदा उठवू पाहतील.
सामन्याची वेळ : सकाळी 6 वा. (भारतीय वेळेनुसार)









