वृत्तसंस्था / पाटणा
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा एकदा विजयी होईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे खासदार जनार्दनसिंग सिग्रीवाल यांनी व्यक्त केला आहे. ते लोकसभेत रेल्वे विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या प्रसंगी भाषण करीत होते. बिहारमध्ये 2014 पासून आतापर्यंत 1 हजार 832 किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग टाकण्यात आले आहेत. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारने 2005 पासून मोठी प्रगती केली असून जनतेला याची कल्पना आहे. त्यामुळे जनता पुन्हा आम्हालाच कौल देईल, असे प्रतिपादन त्यांनी त्यांच्या भाषणात केले आहे.









