मुंबई : अक्षय कुमारने ( Akshay Kumar) काही दिवसापुर्वी तो यापुढे हेराफेरी 3 (Heraphera) चा भाग नसल्याचे जाहीर केल्यानंतर सुनील शेट्टीने ( Sunil shetti) यावर प्रतिक्रिया दिली आहे. गोष्टी पूर्वपदावर येण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे बॉलिवूडच्या ‘आण्णा’ने सांगितले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरलेल्या हेराफेरी या चित्रपटाचे दोन्ही भाग सुपरहीट ठरले होते. अक्षयकुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल (Paresh Rawal) यांची मुख्य भुमिका असलेला हा विनोदी चित्रपट आजही त्याच्या चाहत्याकडून आवडीने पहिला जातो. आता हेराफेरीचा ३रा भाग येत आसल्याने चाहते त्याची उत्साहाने वाट पाहत आहेत.
‘अक्की’ ने यापुढे तो या चित्रपटाचा भाग नसल्याचे जाहीर केले होते. पण हेराफेरीमधील अक्षयकुमारचा सह- कलाकार सुनील शेट्टी याने अक्षयला या चित्रपटात पुन्हा पाहण्यासाठी आशा व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की, “या बातमीने मला धक्का बसला आहे. अक्षयला परत येण्याचा काही मार्ग आहे का हे पाहण्यासाठी निर्मात्यांशी बोलणार आहे.” असेही तो म्हाणाला.
अक्षय कुमारने एका मुलाखतीत म्हटले आहे की, तो आता हेराफेरीच्या ३ऱ्या भागामध्ये असणार नाही. हेराफेरी 3 ची स्क्रिप्ट हा अक्कीला पसंत नसल्याचे त्याने सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाला. “मला हेराफेरी ३ ची ऑफर आली होती. पण मी स्क्रिप्टवर समाधानी नाही. लोकांना जे पहायचे आहे तेच मला करायचे आहे. त्यामुळेच मी एक पाऊल मागे घेतले आहे. हेराफेरी माझ्या आयुष्याचा आणि माझ्या बॉलिवूडच्या प्रवासाचा एक भाग आहे. हा चित्रपट मी करू शकत नाही याचे मला खूप दुःख आहे.”
अक्षयकपूरने खरोखरच हेराफेरीतून माघार घेतली आहे कि, तो एक प्रमोशनचा भाग आहे हे चित्रपट आल्यावरच कळेल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








