आमदार गणेश गावकर यांची माहिती,
धारबांदोडा : दुधसागर धबधब्यावर पावसाळी टेकिंग सुरू करण्याच्या दृष्टीने आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व वनधिकाऱ्यांकडे चर्चा केली असून येत्या काही दिवसात ते सुरू होणार आहे. मायडा व सौझामळ येथे जाण्यासाठी रेल्वे उ•ानपुलासंदर्भात आपला संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती आमदार गणेश गावकर यांनी दिली. कुळे-शिगांव पंचायत क्षेत्रातील सौझामळ येथे स्वयंपुर्ण गोवा पंचायत निधीतून सुमारे पंधरा लाख रूपये खर्चुन बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीच्या उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्याच्यांसोबत व्यासपीठावर धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर, कुळे शिगांव पंचायतीचे सरपंच गोविंद शिगांवकर, उपसरपंच नेहा मडकईकर, पंचसदस्य साईश नाईक, अनिकेत देसाई, अजय बांदेकर, बेनी आजावेदो, सोनम डोईफोडे, प्रसाद गावकर व पंचायत सचिव भूषण तावडे साकोर्डा पंचायतीचे उपसरपंच शिरीष देसाई, मोले पंचायतीचे सरपंच कपिल नाईक उपस्थित होते.
पंचायत क्षेत्रातील विकासकामे प्राधानक्रमाने पुर्ण करणार
पंचायत क्षेत्रात प्रत्येक प्रभागामध्ये जी विकासकामे करायची आहेत त्याचा प्रस्ताव करून कोणते काम प्राथमिक तत्वावर करावे हे प्रस्तावामध्ये नमूद करावे. येत्या तीन चार वर्षात एकही काम शिल्लक राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करू. पंचायत क्षेत्रातील जे लहानसहान साकव मोडकळीस आले होते. ते नव्याने बांधण्यासाठी निविदा निघाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सौझामळ हा भाग विकासाच्या दृष्टीकोनातून मागेल राहिला असून येत्या काळात या प्रभागातील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स केले जाणार असून इतर कामांनाही प्राधान्य दिले जाणार आहे असे सांगून कुळेतील पाणी शुद्धिकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात असून हा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या मिटणार आहे असे ते पुढे बोलताना म्हणाले.
जि. प. निधीतून अंगणवाडीचे सुशोभिकरण करणार
जिल्हा पंचायत निधीतून अंगणवाडी समोर सुशोभिकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे असे आश्वासन जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर यांनी यावेळी दिले. अंगवाडीतील विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागत गीताचे कौतुकही त्यांनी केले. आमदार गणेश गावकर यांचे विकासकामासाठी चांगले सहकार्य मिळत असून त्याच्या नेतृत्वाखाली कुळे पंचायतीचा विकास साधला जाणार आहे. त्यांनी विधानसभा अधिवेशनात गोव्यातील तसेच सावर्डे मतदारसंघातील अनेक प्रश्न अभ्यासपुर्ण पणे मांडलेले आहेत. तसेच सरपंच गोविंद शिगांवकर आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले. स्थानिक पंच तथा उपसरपंच नेहा मडकईकर यांनी आमदरा गणेश गावकर यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या प्रभागातील विकास कामाला गती मिळाली असे आवर्जुन सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मडकईकर यांनी केले.









