काम पूर्ण, ट्रक मंत्री-महोदयांच्या प्रतीक्षेत, मागील अधिवेशनावेळीही मंत्र्यांनी दाखविला होता ठेंगा, उद्घाटन झाल्यास नागरिकांची होणार सोय
प्रतिनिधी /बेळगाव
सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होवू लागला आहे. वाहन चालविण्याचे परवाने मिळविताना यापूर्वी द्यावी लागणारी चाचणीही आता आधुनिक होणार आहे. यासाठीचा ‘ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रक’ बेळगाव शहरासाठी मंजूर झाला आहे. याचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र मंत्री-महोदयांमुळे याचे उद्घाटन लांबणीवर पडत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मागील वषीच्या अधिवेशनावेळी याचे उद्घाटन होईल, अशी शक्मयता होती. मात्र ते झाले नाही. यावेळी तरी या ट्रकचे नशीब उजाळणार का? की मंत्री पुन्हा एकदा ठेंगा दाखविणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील अधिवेशनावेळी या टॅकचे उद्घाटन होणार अशी शक्मयता होती. मात्र संबंधित परिवहन मंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याचबरोबर मागील दोन वर्षांपासून हे ट्रक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कणबर्गी येथे होणाऱया मैदानामध्ये याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आता बेळगावकरांसाठी ही एक शुभ वार्ता होती. मात्र उद्घाटनाअभावी बेळगावकरांना याचा फायदा होणे कठीण होत आहे. मागील चार-पाच वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. सरकारकडून अनुदानही मंजूर करण्यात आले होते. मात्र याचे काम संथगतीने सुरू असल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र उद्घाटन नसल्याने समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री श्रीरामलू यांनी यावषी तरी या ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रकचे उद्घाटन करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्टमुळे चाचणी घेऊन वाहन परवाना देणाऱया पोलिसांवरील ताण कमी होणार आहे. ज्यांना वाहन चालविता येत नाही त्यांची मोठी गोची होणार आहे. हा ट्रक कणबर्गी येथे मंजूर होऊन त्याचे कामही पूर्ण झाले आहे. या ट्रकच्या खाली सेन्सर आणि कॅमेरे बसविले जातात. यामुळे वाहन चालविण्याची चाचणी घेताना संबंधित अधिकाऱयांना ट्रकवर उपस्थित राहण्याची गरज उरणार नाही. पण संबंधित चाचणीचे लाईव्ह व्हिडिओ किंवा रेकॉर्डेड प्रत ते पाहू शकणार आहेत. या ट्रकवर उमेदवार आपले वाहन घेऊन आल्यानंतर सेन्सरच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱयाला माहिती मिळते. वाहन चालविताना चुका झाल्यास तेही बीपच्या स्वरुपात कळणार व उमेदवार कोठे चुकला याची माहिती संग्रहित करता येणार आहे. अशाप्रकारचा अत्याधुनिक टॅक बेळगावात झाला असला तरी तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
मागील दीड ते दोन वर्षांपासून ट्रॅक तयार
मागील दीड ते दोन वर्षांपासून हा ट्रक तयार झाला आहे. दरम्यान, आता आरटीओ कार्यालयच यमनापूर येथे हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या ट्रकचे उद्घाटन झाले तर अनेकांना सोयीचे ठरणार आहे. या ट्रकच्या अहवालावर एखाद्याला वाहन परवाना द्यावा की नाही, याचा निर्णय संबंधित अधिकाऱयांना घेण्याची मुभा होती. सध्या परवाना मिळविण्यासाठी चार प्रकारच्या चाचण्यांना सामोरे जावे लागते. शिकावू व कायमचा परवाना मिळविण्यासाठी या चाचण्या घेतल्या जातात. यासाठी शेकडो वाहनचालक दररोज उपस्थित असतात. या प्रत्येकाची चाचणी घेणे अवघड असल्याने काही वेळा गैरकारभारही होतात आणि वाहन चालविण्याच्या बाबतीत पूर्णपणे सक्षम नसणाऱयांनाही परवाने मिळतात. यासाठीच ही नवी पद्धत अमलात आणण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेऊन तो अमलातही आणला. मात्र तो कधी सुरू होणार? याकडे साऱयांच्या नजरा लागल्या आहेत. आणखी काही दिवस तो ट्रक असाच पडून राहिला तर कुचकामी ठरणार यात शंका नाही. तेंव्हा मंत्र्यांनी यावषी तरी उद्घाटन करावे, अशी मागणी होत आहे.
लवकरच ट्रक होणार कार्यान्वित
कामाला गती मिळाली असून लवकरच हे ट्रक कार्यान्वित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी नियोजित आराखडय़ानुसार 6 कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र आता त्यात वाढ होवून तो 8 कोटी 23 लाखांपर्यंत पोहोचला आहे. ट्रकची निर्मिती, आवश्यक तंत्रज्ञानाची उभारणी आणि आवश्यक जागेची खरेदी यासाठी हा खर्च लागणार होता. हे ट्रक उद्घाटनाच्या विळख्यात अडकले असल्याने समस्या निर्माण झाली आहे.









