कोल्हापूर/प्रतिनिधी
गोवा आणि कर्नाटकातून कोल्हापूरमार्गे राज्यात दारु तस्करी होते. त्यातील लहान मोठय़ा अनेक मार्गावर आता पोर्टेबल नाके बसवले जातील. दारु तस्करीत दोनपेक्षा अधिकवेळा सापडणाऱया लोकांवर मोकासारखा गुन्हा दाखल करण्याबाबत राज्य शासन विचार करत आहे. तसे प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठवण्याच्या सुचना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱयांना दिल्या असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीनंतर देसाई म्हणाले, गोवा राज्यातून येणाऱया मार्गावर कडक तपासणीसाठी नाके उभारण्यात येतील. उत्पादन शुल्क राज्यात तिसऱया क्रमांकाचे उत्पन्न देणारे खाते असून गतवर्षी 17 हजार 500 कोटी रुपयांचा महसूल राज्याला दिला. अवैध दारु वाहतूक रोखण्यासाठी तात्पुर्ते नाके उभारणीसह फ्लाईंग स्क्वॅाड सक्षम करुन उत्पादन वाढवले जाईल. उत्पादन श्ल्कुमधील रिक्तपदे एमपीएससी मार्फत भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. रिक्त जागांपैकी 50 टक्के जागांची विभागांतर्गत होणारी भरती लवकरच सुरू केली जाईल.
हे ही वाचा : कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून
शिवाजी विद्यापीठाची निर्मिती कै. बाळासाहेब देसाई यांनी केली. कोल्हापूरसोबत त्यांचे अतुट नाते होते. बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्र सुरू केले असून त्यासाठी मंजूर तीन कोटीपैकी अडीच कोटी रुपयांचा निधी लवकरच दिला जाईल. या केंद्रात शेती, ग्रामीण आणि शिक्षण विभागात व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस सुरू होतील. देसाई यांच्या नावाने विद्यापीठात कलादालन सुरू करणार आहोत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा शहरातील पुतळा सुशोभिकरण आणि नुतणीकरणासाठी राज्य शासनाने 75 लाख रूपयांचा निधी दिला आहे. याठिकाणी बगीचा, कारंजा आणि विद्युतीकरण आराखडय़ास मंजूरी दिली. याबाबतचा प्रस्ताव तयार करुन प्रशासकीय मंजूरी देवून निवीदा काढण्याच्या सुचना प्रशासकांना दिल्या असल्याचे ना. देसाई यांनी सांगितले.
म्हणूनच निर्णय घेतला
माझा पक्ष काँग्रेससोबत जाणार नाही. थसे झाले तर शिवसेनेच दुकान बंद करीन, असे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते. याचे अनुकरण आता करण्याची वेळ आली आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फरफटत जात होती. भाजपसोबत असलेली पूर्वीची युती आम्ही पुर्नजिवीत केली. ही आमची जुनी युती आहे. म्हणूनच आम्ही तीन महिन्यापूर्वी तो निर्णय घेतल्याचे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले.
ना. देसाई म्हणाले,
मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय नाही.
जुलै अखेरपर्यंत आलेल्या हरकतींवर अभ्यास सुरू.
आमच्या दसरा मेळाव्याची तुलना कोणासोबत नाही.
आम्ही गर्दी खेचू चार दिवसातच दूध का दूध होईल.
आमचा एकही आमदार आरेरावी किंवा आतताईने बोलत नाही.
आम्ही सर्व प्रकारचे भान ठेवून बोलतो.
आमच्यावर आत्मक्लेषाची वेळ येणार नाही.
2024 आमचे 50 चे 52 होतील पण 49 होणार नाहीत.