प्रतिनिधी /पणजी
कोविड विरोधातील बुस्टर डोस देण्यासाठी आणलेला लसीकरण साठा आरोग्य खात्याने जनतेचा प्रतिसाद नसल्यामुळे परत देण्याचे ठरविले असून त्याची पाठवणी सुरू झाली आहे.
राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा साठा तसाच ठेवल्यास तो खराब होण्याची शक्यता असल्याने परत पाठवण्याशिवाय पर्याय नाही. जास्तीत जास्त लोकांना तो डोस देण्याचा बेत होता. परंतु, लोक पुढे येत नसल्याने त्या डोसच्या लसी पडून आहेत. प्रतिदिन 300 च्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी लोक डोससाठी येत असून हा प्रतिसाद अत्यल्प आहे. त्याकरिता लसी आणखी ठेवता येणार नाहीत यासाठी लसी परत करणार असल्याचे सांगण्यात आले.









