Sharad Pawar News : जनतेनं मला सलग 56 वर्षे सत्तेच्या राजकारणात ठेवलं. मात्र आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार अशी घोषणा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.’लोक माझे सांगाती’च्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी सभागृहात पवारांच्या निवृतीच्या या निर्णयाला कार्यंकर्त्यांनी विरोध केला. निर्णय मागे घेईपर्यंत सभागृह सोडणार नाही अशी भूमिका कार्यंकर्त्यांनी घेतली. तर अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मी पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही. नवा अध्यक्ष कोणं हे पक्षातील वरिष्ठांनी ठरवावे अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आयुष्यातला पहिला मोर्चा नववीमध्ये काढला.सलग 56 वर्षे मी कुठल्या न कुठल्या सभागृहाचा सदस्य म्हणून काम केले. 1967 साली पहिल्यांदाच विधीमंडळात जाण्याची संधी मिळाली. 1972 मध्ये मला पुन्हा तिकिट मिळालं. अशी दुसरी व्यक्ती आज देशात हयात नाही, अशी आठवण सांगत स्वत:च्या राजकीय प्रवासाचं पवारांनी वर्णन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, माणसाने आधी व्यक्तीवाचन करायला शिकावं. माझं घर काँग्रेसच्या विचाराचं नव्हत. माझं घर शेकाप पक्षाच्या विचारांचं होतं असेही ते म्हणाले.
Previous Articleमहाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू आणि राजकिय नेत्यांकडून शुभेच्छा
Next Article इन्सुलीतील अपघातात बेळगाव येथील तरुण जागीच ठार !








