प्रकल्पाबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याची माहीती
रत्नागिरी प्रतिनिधी
राजापुरातील बारसू येथील ग्रीन रिफायनरीबाबत शेतकऱयांमध्ये काही गैरसमज असल्याचे दिसून येत आहेत. रिफायनरी पकल्पाबाबत राज्य शासन सकारात्मक आह़े रिफायनरीसाठी जमीन संपादित करण्याची पकिया सुरू झाली आह़े येणाऱ्या दिवसात शेतकऱयांची भूमिका समजून घेवून हा पकल्प पुढे नेण्याचा आमचा पयत्न असेल, असे पतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल़े.
रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सामंत बोलत होत़े पकल्प गुजरातला गेले, यावर आमच्यावर टीका केली जात आह़े मात्र विरोधकांनी रिफायनरी पकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आह़े परराज्यात गेलेल्या उद्योगांचे अपयश लपवण्यासाठी मध्यावर्ती निवडणुकांची पुडी सोडल्याची टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आह़े परराज्यात उद्योग कोणामुळे गेले, हे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. गेलेले उद्योग हे मागील अडीच वर्षातच गेल्याची टीकाही नामदार उदय सामंत यांनी केली.
शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप तसेच इतर अपक्ष आमदार मिळून सध्याच्या घडीला 170 आमदारांचे संख्याबळ आमच्याकडे आहे. मध्यावर्ती निवडणुका लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हा राजकीय डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास देखील त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आपला कार्यकाळ पूर्ण करून ज्यावेळी निवडणुका लागतील, त्या निवडणुका युती म्हणूनच लढवल्या जातील. केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मध्यावर्ती निवडणुकांची हवा केली जात असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सरकारवर या ना त्या कारणावरून आरोप केले जात आहेत. यापूर्वी खोके बोके झाल्यानंतर बांधावर जाऊन शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी झाली, मात्र ज्यावेळी मागणी करणारे सत्तेत होते, त्यावेळी त्यांनी किती भरपाई दिली, असा प्रश्न उदय सामंत यांनी उपस्थित केला. दिवसभराच्या घडामोडींचा आढावा देताना ते पुढे म्हणाले की, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे, त्या वक्तव्याला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मध्यावर्ती निवडणुका लागतील, असे जाहीर केले. हा सारा प्रकार जनतेचे लक्ष विचलित करण्याचा असून सरकार अस्थिर आहे, हे दाखवण्याचा खोटा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे गटाचे 13 आमदार संपर्कात
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे 13 आमदारांपैकी काही आमदार आजही आपल्या संपर्कात असल्याचे सांगून येत्या काही काळात कोण कुठे आहे, हे लवकरच साऱया महाराष्ट्राला दिसून येईल, असा सूचक इशारा नामदार उदय सामंत यांनी यावेळी दिला.









