अभिनेत्री राम्या कृष्णनने केले स्पष्ट
अभिनेत्री राम्या कृष्णन सध्या चर्चेत आहे. विजय देवरकोंडा अन् अनन्या पांडे यांचा चित्रपट ‘लायगर’मध्ये राम्या यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. बॉलिवूडमध्ये मी फारच कमी काळासाठी काम केले, त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत परतणेच योग्य मानल्याचे त्यांनी म्हटले आहे. राम्या यांनी 1983 मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. तमिळ चित्रपट वेल्लाई मानसु या चित्रपटाद्वारे त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 4 दशकांच्या कारकीर्दीत तयांनी तेलगू, कन्नड, मल्याळी अन् हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘दयावान’, ‘परंपरा’, ‘खलनायक’, ‘चाहत’, ‘बनारसी बाबू’ आणि बडे मियां छोटे मियां’ या हिंदी चित्रपटांमध्ये त्या दिसून आल्या होत्या. माझा कुठलाच हिंदी चित्रपट फारसा गाजला नाही. तेलगू चित्रपटसृष्टीत मात्र मी नाव कमावून होते. तेलगू चित्रपटसृष्टी साडून हिंदी चित्रपटजगतात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत करण्याची माझ्यात क्षमता नव्हती. तेलगू चित्रपटसृष्टीत मी अधिक कम्फर्टेबल होते असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
राम्या यांनी अनेक प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात अल्लारी प्रियुडू, कांटे कुथुरने काने, पडायप्पा, स्वीटी नन्न जाडी, बाहुबली, सुपर डिलक्स या चित्रपटांचा यात समावेश आहे. कमल हासन यांच्यासोबत काम करण्यास मिळाल्याने मी सुदैवी आहे. त्यांच्यासोबतचा चित्रपट यशस्वी ठरला होता. त्यानंतर रजनीकांत यांच्यासोबत दोन चित्रपट करता आल्याचे राम्या यांनी म्हटले आहे.









