नेवरीत २ कोटी ३ लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन; महाडीक विद्यालयात अत्याधुनिक सभागृह बांधणार
पलूस कडेगाव मतदारसंघात विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नाही तसेच नेवरी येथील श्री बाल महाडीक विद्यालयात अत्याधुनिक सभागृह बांधणार असं आश्वासन माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉ विश्वजित कदम यांनी दिले. येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन कार्यक्रम डॉ कदम यांचे हस्ते आयोजित करण्यात आले होते त्यावेळी डॉ कदम बोलत होते. यावेळी सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम,रयत शिक्षण संस्थेचे नूतन उपाध्यक्ष महेंद्र लाड, सदस्य जे के जाधव, विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन अध्यक्ष सुरेश पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुजय शिंदे,युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इंद्रजित साळुंखे उपस्थित होते.
यावेळी डॉ कदम पुढं म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत एकदिलाने काम करायचं आहे. लोकांपर्यंत विकासकामे पोहचवून सर्वसामान्य लोकांची कामे करण्यावर भर द्यायचा आहे. प्रत्येक गावात विकासकामे सुचवून निधीची मागणी करा. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे नूतन उपाध्यक्ष महेंद्र लाड,नूतन सदस्य जे के जाधव, विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन अध्यक्ष सुरेश पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन अध्यक्ष सुजय शिंदे, डॉ पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जालिंदर महाडीक, नेवरी गावच्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ प्रमिला दत्तात्रय साळुंखे, उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार घेण्यात आला. यावेळी डॉ. कदम यांच्या हस्ते नेवरी गावातील एकूण २ कोटी ३ लक्ष रुपये विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटने करण्यात आले.यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत नेवरी ते पाझर तलाव घानवड रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-१४१ लक्ष,ग्रामपंचायत इमारत व सभागृह बांधकाम करणे २५ लक्ष, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे ३७ लक्ष ही विकास कामे आहेत.
यावेळी राहुल गायकवाड, सुमित गायकवाड,प्रकाश जाधव, महेश कदम, मालनताई मोहिते, सुरेश मोहिते, आकाश साळुंखे, गणपत शेठ सावंत, शिवाजी पाटील, सुरेश निर्मळ, सागर सूर्यवंशी तसेच आसपासच्या गावातील सरपंच ,उपसरपंच व आजी माजी पदाधिकारी तर नेवरी गावच्या सरपंच सौ. प्रमिलाताई साळुंखे, उपसरपंच राजाराम महाडीक,शंकर महाडीक, रंगराव महाडीक,शशिकांत महाडिक,बाळासाहेब महाडीक, आत्माराम मंडले, उपस्थित होते.








