ऑनलाईन टीम / तरुण भारत :
50 लाख रुपये द्या, अन्यथा कथित अश्लिल व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी भाजप नेते किरीट सोमय्या यांना देण्यात आली आहे. सोमय्यांच्या कार्यालयात हा धमकीचा मेल आला आहे.
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांचा अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एक नव्हे तर जवळपास 36 क्लिप व्हायरल झाल्या होत्या. हाच कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अज्ञात आरोपीने मेलद्वारे दिली आहे. त्यासाठी 50 लाखांची खंडणी सोमय्या यांच्याकडे मागण्यात आली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून ऋषिकेश शुक्ला नावाच्या व्यक्तीवर कलम 385 अन्वये मुलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवघर पोलीस अधिक तपास करत आहेत.








